सांगली मुले पळवणारी चोरांची टोळी समजून गैरसमजुतीतून चौघा साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना जत तालुक्यातील लवंगा येथे घडली. यानंतर उमदी पोलिसांनी कारवाई करत साधूंना नागरिकांच्या तावडीतून सोडवले...
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते.
दरम्यान रस्त्यात गाडी थांबवून विजापूर हा रस्ता कोणता आहे याबाबतची विचारणा एका विद्यार्थ्यास केली असता पोरे चोरणारी टोळी समजून चारही साधूंना गाडीतून ओढून काठीने, पट्ट्याने मारहाण करण्यात आली.
