नाशिक हळहळलं! बाल्कनीतून तोल जाऊन महिलेचा मृत्यू; थरारक घटना CCTVत कैद

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशकातील  सातपूर एमआयडीसीमध्ये बाल्कनीतून तोल जाऊन एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. मंगला दत्तात्रय दळवी (वय 72) असं मृत महिलेचं नाव आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय 

प्राप्त माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर एमआयडीसी भागात एबीबी कंपनीच्या पाठीमागे सोमेश्वर कॉलनीत मंगला दळवी यांच्या भावाचा फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये त्या आशा फडणवीस यांच्यासोबत राहत होत्या. मंगळवारी सायंकाळी गॅलरीत उभ्या असतांना त्यांचा अचानक तोल गेला आणि त्या खाली पडल्या.

उंच इमारतीवरून खाली पडल्याने मंगला यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

घडलेली घटना दुर्दैवी असून बांधकाम व्यावसायिकांनी देखील इमारत उभारतांना सुरक्षित गॅलरी कराव्यात, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरिक्षक चव्हाण यांनी केले. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मंगला यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default