करकी चेक पोस्टवर 21 लाखांचा गुटखा पकडला

फुले शाहू आंबेडकर
0

मुक्ताईनगर पोलीस  ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची  वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक  परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाने तयार करण्यात आलेल्या पथकाने कारवाई करत करके चेक पोस्टवर 21 लाखांचा गुटखा पकडला ही मोठी कारवाई मानली जात आहे. यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

या कारवाईबाबत आरटीओ चेक पोस्ट तसेच मुक्ताईनगर पोलीस प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे तसेच या संदर्भात त्यांनी मौनव्रत धारण केल्याचे दिसून येत असल्याने त्या विभागांच्या कामकाजा बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सदर गुटखा मध्य प्रदेशातून ज्या वाहनातून अवैधरित्या वाहतूक करीत होता त्या वाहनाचा चालक चेतन झांबरे वय 32 वर्षे राहणार कोथळी तालुका मुक्ताईनगर त्याचा सहकारी विनायक चांदलकर वय 19 वर्षे राहणार बोदवड तसेच प्रतिबंधित साठ्याचा मालक अनुपम गोसावी राहणार मुक्ताईनगर तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील विकी टिल्लानी अशा दवाखान्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर कारवाई होण्यासाठी पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर पोलीस ठाणे यांना लेखी रिपोर्ट द्वारे कळविण्यात आले व त्यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन जळगाव कडील रामचंद्र भरकड यांच्याशी संपर्क साधून कळविण्यात आले व फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपींवर भा.द. वि.कलम 328 , 272 , 273 , 188 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default