दुधाळे येथील विवाहितेचा 50 लाखांसाठी छळ

फुले शाहू आंबेडकर
0

घर बांधण्यासाठी माहेरुन 50 लाख रुपये आणावेत अन्यथा फारकत देण्यात येईल, अशी धमकी देत विवाहितेला शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमळनेर तालुक्यातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दुधाळे शिवारातील रहिवासी सुनिता संदीप चव्हाण (32) या विवाहितेने वडीलांकडून घर बांधण्यासाठी 50 लाख रुपये आणावेत अन्यथा फारकत देण्यात येईल, अशी धमकी देत शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तांबेपूरा ता.अमळनेर येथील रमेश मुकूटराव चव्हाण, हिराबाई रमेश चव्हाण, श्रीकांत रमेश चव्हाण, निकिता श्रीकांत चव्हाण, शिवाजी पांडुरंग भदाणे, भुषण शिवाजी भदाणे, जयश्री भुषण भदाणे, संदीप रमेश पाटील यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कलम 498 (अ), 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ मन्साराम गवळी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default