पाच हजारांसाठी गळा दाबून एकाचा खून

फुले शाहू आंबेडकर
0

ऊसणवारी घेतलेले पाच हजार रुपये देत नसल्याच्या कारणावरुन दोघांनी एकाचा गळा आवळून खून  केला. व मृतदेह कन्नड घाटात फेकून पसार झाले. परंतू तांत्रीक माहितीच्या आधारे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी या गुन्हांचा यशस्वी तपास करीत, दोघे आरोपींच्या मुसक्या आवळ्या आहेत. अतिशय किचकट गुन्हांच्या उकल केल्यामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे कौतूक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावरील कन्नड घाटातील जय मल्हार पॉंईन्टच्या अलीकडे खोल दरीत दि,२९/०८/२०२२ रोजी एक अनोळखी पुरुषाचा मृतदेहा आढळुन आला होता. सुरुवातीला याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अनोळखी मयताचा चेहरा पूर्णपणे कुजलेला असल्याने पोलिसांना त्याची ओळख पटविणे अवघड झाले होते. पोलिसांनी फोटोग्राफर अनिकेत जाधव याचेकडून मयताचा फोटो डेव्हलप करुन चेहरा थोडा स्पष्ट केला व त्यावरुन मयताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटविण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले ते प्रेत मधूकर रामदास बुटाले(४५) रा. न्यायनगर, औरंगाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लागलीच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. पोलिसांंनी मारेकर्‍यांचा कोणताही मागमूस नसतांना तपासाची चक्रे फिरविली व गुप्त माहिती तसेच तांत्रिक विश्‍लेषणाच्या सह्याने दि,३०/०९/२०२२ रोजी सदर मयताचे मारेकरी शोधून त्यांना ताब्यात घेतले. मयताचा मेहुणा गोपाल शंकर पंडीत (३२) व त्यांचा मित्र कृष्णा रामदास भोसले (२५) दोन्ही रा. औरंगाबाद हे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलविले असता, त्यांनी सुरुवातील गोपाल पंडीत याने मयताची मुलगी धुळे येथे दिलेली असल्याने कदाचित तो औरंगाबाद येथून धुळे येथे जाण्यासाठी निघाला असावा व कन्नड घाटात उतरुन दारुच्या नशेत घाटात पडला असावा अशी माहिती देवून पोलिसांची दिशाभूल केली 

परंतू पोलिसांनी पोलीशी खाक्या दाखल्यानतंर दि,२७ /०८/२०२२ रोजी गोपाल पंडीत व मित्र कृष्णा रामदास भोसले हे दोन्ही मयतासोबत औरंगाबाद रामगिरी हॉटेल येथून गोपाल पंडीत याची रिक्षा(क्र.एमएच,२०, ईएफ ७९८४) यात बसून सावित्रीनगर मार्गे वरुड गावी जात असतांना ५ हजार रुपये देण्याच्या वादावरुन कृष्णा भोसले व मयत मधूकर बुटाले यांचे रिक्षातच भांडण झाले.

कृष्णा भोसले याने मयत मधूकर बुटाले याचा गळा दाबून खून केला व तो मयत झाल्याची खात्री झाल्यानतंर दोन्ही आरोपीनी मिळून त्याचेे प्रेत रिक्षाने औरंगाबाद येथून कन्नड घाटात जय मल्हार जवळ फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगीतले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात खूनाचा गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

हि कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय ठेंगे, सहा पोलीस निरिक्षक हर्षा जाधव, पोहेकॉ. युवराज नाईक, पोना शांताराम पवार, सफौ राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ. नितीन सोनवणे, पोना शंकर जंजाळे, पोना संदिप माने, पोना मनोज पाटील, पोना प्रेमसिंग राठोड, चालक सफौ. अनिल आगोणे आदिच्या पथकाने केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default