असे पोलिस अधिकारी विभागाला कलंक!

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : जिल्‍हा पोलिस दलातून  निलंबित गुन्हे शाखा  निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात त्याच्या अटकपूर्व जामिनावर कामकाज होत आहे. 
मराठा समाजाप्रति आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी निरीक्षक बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मराठा समाजाकडून तीव्र भावना उमटून आंदोलन मोर्चे काढण्यात आले. प्रकरण चिघळत जात असतानाच जिल्‍हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याने बकाले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर शुक्रवार कामकाज होत आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासावर आक्षेप घेतल्याने पोलिस अधीक्षकांनी गुन्ह्याचा तपास आता पोलिस उपअधीक्षक गावित यांना सोपविला.

पाच पथके तयार

किरणकुमार बकाले व अशोक महाजन या दोघांच्या शोधार्थ विविध पाच पथके नव्याने तयार करण्यात आली आहेत. त्यात गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देवरे यांच्यासह चार कर्मचारी आणि मुख्यालयातील मातब्बर कर्मचाऱ्यांची पाच पथकांत विभागणी करून उपलब्ध माहितीच्या अधारे त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

असे अधिकारी कलंक...

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले, की राज्यात मराठा समाज पालकत्वाची भूमिका निभावत असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जात असताना पोलीस विभागातील एका जबाबदार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने समाजाविषयी असं संभाषण करणे म्हणजे पोलीस विभागाला कलंक असल्याचे म्हटले. याप्रसंगी माझी जि. प. सभापती रवींद्र पाटील अजय पाटील यांनीही आक्रमक भूमिका मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default