तळोदा येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जनमित्रांना अश्‍लिल व अर्वाच्च शब्दांचा वापर

फुले शाहू आंबेडकर
0

थकबाकी वसुली आढावा बैठकीत महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.शिवलकर यांनी महावितरणच्या  तळोदा उपविभागातील जनमित्रांना  अश्लील व अर्वाच्च शब्दाचा वापर केल्यामुळे त्यांनी आज दि.१९ ऑक्टोबरपासून बेमूदत अर्जित रजेवर जावून असहकार आंदोलन  पुकारले आहे.

याबाबत कृती समिती तळोदा उपविभागने महावितरणचे अधिक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१८ ऑक्टोबर २०२२ रोजी शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.शिवलकर यांनी बोरद कक्षात वीजबील थकबाकीबाबत आढावा बैठक घेतली.

बैठकीत थकबाकी यादी तपासत असतांना प्रत्येक जनमित्रास अश्लील व अर्वाच्य शब्दात मानहानी करण्यात आली. जनमित्रास शेणातले किडे व कपडे काढून प्रत्येकाला लाथा मारल्या पाहिजे या शब्दात सुनावले.

सर्व जनमित्र कंपनीने दिलेले उदीष्टये सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. तळोदा उपविभाग हा भाग दुर्गम व अतिसंवेदनशील असतांनाही कोणतेही पोलीस संरक्षण न देता आम्ही कार्य करीत असतो. अनेकवेळा वीजग्राहकाकडून वीजबील वसुली करतांना दमदाटी व मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात येते.

तरीही कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळत नाही. शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.शिवलकर हे कुटूंबप्रमुख असतांना कोणत्याही अडचणी ऐकून न घेता प्रत्येक आढावा बैठकीत जनमित्रास मानसिक खच्चीकरण करतात, बैठकीत अरेरावी, गेट आऊट याप्रमाणे बोलणे नित्याचे आहे. कंपनीची अर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.

त्याप्रमाणे उपकार्यकारी अभियंता तळोदा उपविभाग व कक्षप्रमुख यांनी दिलेले आदेश तंतोतंत पाळून वसुलीचे उदीष्टये पूर्ण केले जाते. परंतू कार्यकारी अभियंता श्री.शिवलकर कधीही मानवीय दृष्टीकोनाने बोलत नाही.

सतत अपमानास्पद व माणूसकीहीन वागणूक देतात. श्री. शिवलकर यांंच्या त्रासास कंटाळून आज दि.१९ ऑक्टोबरपासून तळोदा उपविभागातील सर्व जनमित्रांनी बेमूदत अर्जित रजेवर जावून असहकार आंदोलन पुकारले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default