२८ वर्षीय महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा; पालघरमधील दुर्देवी घटना

फुले शाहू आंबेडकर
0
पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरच्या  सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तृप्ती कौस्तुभ घरत (वय २८) असं या महिला डॉक्टरचं नाव आहे.
तृप्ती यांचा मृतदेह मंगळवारी (४ ऑक्टोबर) रात्री त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. २८ वर्षीय तृप्ती या बीएएमएस एम.डी डॉक्टर होत्या. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तृप्ती यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तृप्ती यांच्याजवळ एक सुसाईट नोटही सापडली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default