चाळीसगाव येथे जुन्या वादातून दुचाकी पेटून दिली

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील आंबेओव्हल येथे जुन्या वादाच्या कारणावरुन तिघांनी संतापात एकाच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटून दिल्यांची घटना दि. २५ रोजी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी दिलीप जगन सोनार रा.आंबेओव्हल यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी( क्र.एमएच ०४, डीझेड १४२८ ) हि घरासमोर लावली होती. दि. २५ रोजी तालुक्यातील लोणजे येथील राहणारे विजय हिरा राठोड, लघु राजू राठोड, पिटु भावडू राठोड यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटून दिली.

यात दुचाकी जळून खाक झाली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलीप सोनार यांच्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नितीन सोनवणे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default