चाळीसगाव प्रतिनिधी
शहरातील शिवशक्ती नगर येथे सासरा आणि सुनेत झालेल्या घरगुती वादात सासर्याने सुनेचा गळा दाबून खून केला आहे. सुनेल्या संपवल्यानतंर सासरा स्वतःहून पोलिसात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर घरगुती वादाचा तपशील पोलीस समोर कथन केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की उत्तम पुंजाजी चौधरी रा. शिवशक्ती नगर यांच्या मुलाचा विवाह टेकवाडे तालुका शिरपूर येथील कविता हिचेेशी झालेला आहे. विवाहानंतर कविता ही मला आणि माझी पत्नी व इतर सदस्यांची वाद घालत होती. सुनेचा एक मुलगा आणि सव्वा दोन महिन्यांची मुलगी आहे. बाळंतपणानंतर मुलाने त्याची पत्नी कविता हिला माहेरून चाळीसगाव आणलेले होते.
यादरम्यान सासरे शिवशक्ती नगर मधील मुलाच्या घरी आले. मुलगा राहुल कामानिमित्त बाहेर गेलेला होता. तर उत्तम चौधरी यांची पत्नी देखील नातवाला खेळायला घेऊन बाहेर गेलेली होती. सुनेला चहा बनवायला सांगिते. त्यावर सुनेने खडे बोल सुनावले आणि त्यानंतरही उत्तम चौधरी यांना उद्देशून बोलणे चालूच ठेवल्याने, सुनेवर राग अनावर झाला आणि बेडरूम मध्ये गळा दाबून सुनेला मारले, थोड्या वेळात स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. सासर्या या जबाबावरुन चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
