राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील बदल्यात घोळ

फुले शाहू आंबेडकर
0

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यस्थापक कक्ष जळगाव अंतर्गत तालुकास्तरावर कार्यरत तालुका व्यवस्थापक  प्रभाग समन्वयक  शिपाई, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या नुकत्याच जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून तडकाफडकीचे आदेश काढून कर्मचार्‍यांवर जबरदस्तीने लादण्यात आले आहेत.

या आदेशात राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाचे कार्यालयीन परिपत्रक 24 फेबु्रवारी 2022 व मनुष्यबळ संसाधन पुस्तिकेत नमूद मार्गदर्शन सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आलेले नाही. प्राासकीय बदल्या करण्याबाबत राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाकडून कुठल्याही सूचना नसताना रिक्तपदांवरील विनंती बदल्यांच्या व्यतिरिक्त इतर कर्मचार्‍यांना प्रशासकीय सोईचे कारण दाखवून अदलाबदल करण्यात आले असून ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील बदल्यांमध्ये सावळा गोंधळ असल्याचा प्रकार समोर आला आहे 

प्रकल्प संचालक मीनल कुटे यांनी विनंती नसलेल्या तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांची कोणतेही पूर्वसूचना न देता मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव यांच्याकडे बदल्या प्रस्तावित करुन 27 मे 2022 रोजी तडकाफडकी बदली आदेश प्रसिद्ध केले. यातील काही प्रभाग समन्वयक हे मार्च 2020 पासून नियुक्त झालेले असून नियुक्तीस अल्पकाळ झालेला आहे. जिल्हा कक्षातील जिल्हा व्यवस्थापक या पदावर तालुका व्यवस्थापक अनिल बडगुजर पाचोरा, राहुल ठोसरे भुसावळ, महेंद्र लांबोळे पारोळा या कर्मचार्‍यांना अतिरिक्त पदभार असे नमूद न करता जिल्हा व्यवस्थापक या पदावर उड्डाण पदोन्नतीने कायमस्वरुपी पदस्थापना करण्यात आलेल्या आहेत.

तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष जळगाव येथील डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई सचिन पांढारकर व प्रदीप बारेला हे तालुकास्तरावरील नियुक्त कर्मचारी असताना त्यांची जिल्हा कक्षातील पदांवर बदली करण्यात आलेली आहे. सदर व्यक्ती मीनल कुटे यांच्या मर्जीतील असल्यामुळे त्यांची जिल्हा कक्षात नियुक्ती केली आहे. हा बदली आदेश नियमबाह्य असल्याचा आरोप दिनेश भोळे यांनी केला.

कर्मचार्‍यांवर दबावतंत्राचा वापर

जळगाव येथील अभियानाच्या इनटेनसिव्ह पद्धतीने अंमलबजावणीपासून आजपावेतो अधिक काळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील विस्तार अधिकारी (सांख्यिकी) किशोर राणे यांच्याकडे लेखाधिकारी (उमेद) हा पदभार देखील आहे. तसेच सध्यास्थितीत जिल्हा अभियान व्यवस्थापक हा अतिरिक्त पदभारही किशोर राणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मीन कुटे यांनी किशोर राणे यांच्या सल्ल्याने कर्मचार्‍यांची कोणतीही सोय विचारात न घेता सुडबुद्धीने बदल्या प्रस्तावित करुन मंजुरी घेतली असून येथील कर्मचार्‍यांना प्रकल्प संचालक मीनल कुटे व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया हे विनंतीला दाद  देत नसून कर्मचार्‍यांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप दिनेश भोळे यांनी केला आहे 

उच्च स्तरीय चौकशी करा

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षात अभियानासाठी प्राप्त निधीचा आर्थिक गैरव्यवहार देखील प्रकल्प संचालक मिनल कुटे व यापुर्वी नियुक्तीस असलेले प्रकल्प संचालक, किशोर राणे व जिल्हा व्यवस्थापक लोकेश जोशी यांच्या संगणमताने गेल्या काही वर्षात सर्रास सुरु आहे. जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष जळगाव येथील अनागोंदी कारभाराची उच्च स्थरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी दिनेश भोळे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे राज्य व्यवस्थापकांकडे केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default