यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरूणी ही परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा निलेश पंढरीनाथ पाटील याची तरूणीशी २०२१ मध्ये ओळख निर्माण झाली. यानंतर त्यांचे मैत्रीत रूपांतर झाले. नंतर तरूणीला निलेशने लग्नाचे आमिष दाखवत तिच्या आजीच्या घरी आणि त्यांच्या खळ्यात तरूणीवर जुन २०२२ पर्यंत वेळीवेळी वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली
जबरदस्ती केला गर्भपात
सदरची माहिती निलेशला समजल्यानंतर त्याने तरूणीची इच्छा नसतांना गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान तरूणीने नातेवाईकांसह येथील पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित निलेश पाटील विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक झाली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.
