नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे.खासगी बस
भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात आठ ते दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत माहिती दिली आहे की, ''या आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.''
अपघातात होरपळून 8 ते 10 जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान या आगीत आठ ते दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
