महिलेला घरात एकटी पाहून केला बलात्कार....
पीडित महिलेने आपल्या पतीला दारू सोडवण्यासाठी औषधाची विचारणा केली असता पुंजाराम याने आपणच असे औषध देतो असं महिलेला म्हणाला. दरम्यान एक वर्षांपूर्वी पुंजाराम महिलेला भेटल्यावर, तु माझ्या मनुर येथील गावात ये मी तुला दारु सोडण्याचे औषध देतो असे म्हणाला. त्यामुळे महिला दुपारी 12 वाजता पुंजाराम यांने बोलवल्याप्रमाणे त्याच्या मनुर येथील पडक्या घरात गेले. यावेळी घरात कोणीच नव्हतं. तर महिलेनी यावेळी पतीची दारू सोडवण्यासाठी औषधाची मागणी केली. पण महिलेला एकटीच पाहून पुंजाराम याने तिच्यासोबत बळजबरी करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण पुंजाराम याने तोंड दाबुन महिलेवर बळजबरीने बलात्कार केला.
महिलेवर अत्याचार केल्यावर आरोपीने ही बाब कुणाला सांगितल्यास घरच्यांसह तुलाही जिवंत मारून टाकेल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर त्यांने पुन्हा दोन वेळा धमकी देऊन महिलेवर अत्याचार केला. तर गेल्या काही दिवसांपासून आरोपी हा महिलेला पून्हा धमकी देऊन आपल्या घरी येण्यासाठी सांगत असल्याने महिलेने अखेर घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला.त्यामुळे अखेर याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्यात पुंजाराम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार...
दुसऱ्या एका घटनेत गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 18 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्नड शहरातील सतरा वर्षांच्या मुलीला 22 सप्टेंबर 2021 ते 15 जुन 2022 दरम्यान गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथील 18 वर्षीय तरुणाने गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवार व कन्नड तालुक्यातील मोहडी येथे नेवुन तिच्या मर्जीविरूध्द तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अल्पवयीन मुलीने गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये 17 नोव्हेंबर रोजी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
