ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार: दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा

फुले शाहू आंबेडकर
0
शिंदखेडा तालुक्यातील ब्राम्हणे  येथे दोन जणांनी  महिलेवर बलात्कार केला. बेदम मारहाण  करीत सिगारेटचे चटकेही दिले. याप्रकरणी दीड वर्षांनंतर  दोंडाईचातील दोघांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत 45 वर्षीय महिलेने या घटनेबाबत तक्रारी अर्ज दिला होता. तिला चौकशीसाठी बोलविले असता तिने काल फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दि. 27 मार्च 2021 रोजी अशोक लक्ष्मण बडगुजर व गणेश लक्ष्मण बडगुजर (रा. शिवाजी नगर, दोंडाईचा) यांनी अचानक पिडीत महिलेच्या घरात घुसून आतून दरवाजा बंद करून महिलेवर जबरीने आळीपाळीने बलात्कार केला.
काठीने व हाताबुक्यांनीही मारहाण करीत गुप्त भागावर सिगारेटचे चटके दिले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करीत याबाबत कुठे वाच्चता केली तर तुला गावात राहु देणार नाही, तुझी धिंड काढू, आमच्या इतर जातीच्या लोकांना फसवते, अशी धमकी दिली. त्यावरून वरील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास एसडीपीओ प्रदीप मैराळे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default