जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावठी दारुचे अड्डे असून, भट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पध्दतीने दारू तयार करून विक्री केली जात आहे. त्याची माहिती तालुका पोलीसांना मिळाल्यानंतर शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी ही कारवाईचे सत्र राबविण्यात आले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील भोलाणे या गावात तापी नदीच्या काठालगत भीमराव कोळी यांच्या हातभट्टीवर धाड टाकण्यात आली.
या कारवाईत 19 ड्रम कच्चे व गरम 3400 लिटर रसायन चालू भट्टीतील दारुसह एकूण 87 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यासह गाढोदा येथे प्रवीण भगवान सोनवणे यांच्या गावठी हातभट्टीचा दारुचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. तिसरी कारवाई खोटेनगर येथील आरोपी जयवीर राजपुत याच्या ताब्यात देशी दारू बॉटल मिळून आल्या. या कारवाईत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसर्या दिवशीही धडक कारवाई
पोलिसांकडून दुसर्या दिवशी रविवारी देखील कारवाईची मोहीम सुरु होती. यामध्ये भोलाणे येथे महेंद्र शिवनाथ कोळी याच्या 7 ड्रम कच्चे व गरम 1200 लिटर रसायन चालू भट्टीतील तयार दारूसह 35 हजार रुपयांचा मुद्देमाल याठिकाणी आढळून आला.
यासह दापोरा शिवारातील कुरकुर नाल्याजवळ अशोक उर्फ काल्या रामदास सोनवणे याच्या 4 ड्रम कच्चे व गरम 700 लिटर रसायन चालू भट्टी वरील तयार दारू सह 19 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
