गव्हाळी येथील सिमा तपासणी नाक्यावर २९ लाखांचे विदेशी मद्य जप्त

फुले शाहू आंबेडकर
0

नंदुरबार 

अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी येथील सीमा तपासणी नाक्याजवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व सिमा तपासणी पथकाने २८ लाख ७० हजार रुपये किमतीची विदेशी दारु जप्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दि.६ नोव्हेंबर २०२२ रोजी अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावरून अक्कलकुवामार्गे एका आयशर वाहनामधून किराणा सामानाच्यामागे अवैध देशी विदेशी दारु व बियरची  चोरटी वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार श्री.कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्याच्या पथकाने अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी सिमा तपासणी नाक्याजवळ सापळा लावला.

दि.६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिमा तपासणी नाका येथे मर्यादेपेक्षा जास्त भार असलेले आयशर वाहन आले म्हणून पथकाने त्या वाहनाचे वजन क ेले असता प्रमाणापेक्षा जास्त वजन भरल्याचे दिसून आले.

त्याचदरम्यान वाहन चालकाने वाहन बाजुला घेवून तेथून पळ काढला. त्या आयशरची तपासणी केली असता त्यात ८ लाख २८ हजार रुपये किमंतीची माऊंंटस् ६००० सुपर स्ट्रॉंग बियरचे ५०० एम.एल. चे एकुण ३४५ पत्राचे टिन व त्यामध्ये एकुण ८२८० पत्राचे टिन,

२० हजार १६ रुपये किमंतीची रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिसकीचे एकुण ३५० खोके, त्यामध्ये एकुण १६ हजार ८०० सिलबंद बाटल्या, २६ हजार ४०० रुपये किमतीचे मुरमुरे भरलेल्या प्लास्टीकच्या एकुण ८८ गोण्या,

१० लाख रुपये किंमंतीचे आयशर वाहन (क्रमांक एमपी-०९ जीई-६५५१) असा एकुण ३८ लाख ४० हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत वाहन चालकाविरुध्द् महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, जितेंद्र अहिरराव, अविनाश चव्हाण, किरण मोरे, तुषार पाडवी यांच्या पथकाने केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default