सोनगीर पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश येथील इंदोरमार्गे धुळ्याकडे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला अवैधरित्या वाहतूक करून आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोनगीर पोलिसांनी देवभाने फाटा या ठिकाणी सापळा रचला. या सापळा दरम्यान संबंधित ट्रक पोलिसांना आढळून आला.
प्रतिबंधितीत गुटखा, पान मसाला जप्त; सोनगीर पोलिसांची कारवाई
मंगळवार, नोव्हेंबर ०८, २०२२
0
धुळे : सोनगीर पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाल्यासह जवळपास 51 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांतर्फे जप्त करण्यात आला आहे.
Tags
