जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार शहाद्यातील जैन मंदिरातील चोरीत मध्यप्रदेशमधील कुख्यात गुन्हेगार सुल्तानशेख व सूरज ठाकूर यांचा हात असल्याने त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी पथक सनावद (जि. खरगोन) येथे पाठविले. हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...सुल्तान व सूरज ठाकूर यांचे राहण्याचे ठिकाण शोधत त्यांच्या घराच्या परिसरात वेषांतर करुन सापळारचला. बुधवारी (ता.२१) पहाटे चारच्या सुमारास घरात प्रवेश करताना दोघे दिसले.
पथकाने त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. सुल्तान शेख रशिद शेख (१९, रा. लाचीवाडा, मोठी मशिदच्या बाजूला, दाहोत गुजरात) ह. मु. सनावद ( जि. खरगोन मध्यप्रदेश) तर दुसरा सूरज नवलसिंग ठाकूर (२०,रा. अकोला, (महाराष्ट्र, ह. मु. सनावद, काठीबेडी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत शहादा येथील मंदिरातील चोरीबाबत विचारले असता त्यांनी कबुली दिली.
सुल्तानच्या बॅगेतून ४१ हजार ३१० रुपये रोख व सूरज ठाकूरच्या बॅगेतून ३९,८०० रूपये रोख असा एकूण - ८१ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांनी गतकाळात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मंदिरातून अशाच प्रकारची चोरी केलेली असल्याचे सांगितले. त्यांनी मनमाड, चांदवड, अकोला, फ्रेजरपुरा (अमरावती), आडगाव (नाशिक), मंडलेश्वर (मध्यप्रदेश) येथे गुन्हे दाखल हेत.
