काळजीपोटी वडीलांनी लक्ष ठेव सांगितले..तर मित्राच्‍या मुलीलाच म्‍हणाला चान्‍स दे..

फुले शाहू आंबेडकर
0
काळजीपोटी वडीलांनी मित्राला मुलीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. परंतु, याचा फायदा उचलत त्‍याच मित्राने मुलीलाच थेट मागणी केल्‍याचा धक्‍कादायक  प्रकार समोर आला आहे. 
ड्रायव्हर वडिलांनी दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर लक्ष ठेवण्यास मित्राला सांगितले. मित्राने अल्पवयीन मुलीस तू ज्या मुलासोबत बोलतेस, त्याचे पुरावे  माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे तुझ्या वडिलांना देणार आहे. वडिलांना सांगायचे नसेल तर मला भेटायला ये आणि एक चान्स दे.., अशी मागणीच केली. 

दामिनी पथकाने रचला सापळा

घाबरलेल्या मुलीने तीन दिवसांपासून जेवण केले नाही. शेवटी दामिनी पथकाला आपबीती सांगितली. त्यानुसार दामिनी पथकाने मुलीला बोलावलेल्या ठिकाणी सापळा रचला. यानंतर मुलीजवळ आलेल्‍या त्‍या नराधमास पथकाने ताब्यात घेतले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default