पोटात दुखतं म्हणून मुलीला डॉक्टरांकडे नेलं; X-RAY पाहून कुटुंबीय हादरले!

फुले शाहू आंबेडकर
0
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अचानक पोट दुखू लागल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले. या मुलीची तपासणी करताच डॉक्टरांना धक्काच बसला. १४ वर्षीय मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं 

डॉक्टरांनी याची माहिती आईला सांगताच, आईच्या पायाखालची जमीनच सरकली. याबाबत मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, गावातील एका तरुणाने आपल्यावर अत्याचार केली असल्याची कबूली या मुलीने आईला दिली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अकोला पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे. वैभव विजय गोंडकार असं आरोपी तरुणाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे वैभव सोबत गेल्या दोन वर्षापासून संबंध होते.

पीडितेचे आई-वडील हे वेगवेगळे राहतात. लॉकडाऊनमध्ये पीडिता व तिची आई मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते गावात आले. यानंतर पीडिता आणि तिच्या आईने अकोला येथील एका शॉपीमध्ये काम सुरू केले. त्यावेळी आरोपी वैभव हा सुद्धा अकोला येथे चकरा मारीत 

यादरम्यान, आरोपी वैभवने पीडित मुलीला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर वेळोवेळी त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान, पीडिता ही गरोदर राहिली. अचानक पोटात दुखू लागल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले असता, ती गरोदर असल्याचं उघड झालं.

याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी वैभव याच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default