ग्रामसडक योजनेंतर्गत 17 रस्त्यांना मंजुरी : आमदार मंगेश चव्हाण

फुले शाहू आंबेडकर
0
चाळीसगाव : तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या रस्त्यांच्या समस्या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडल्या असता त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 'संशोधन आणि विकास’ या हेड अंतर्गत तालुक्यातील ४० किलोमीटरच्या १७ रस्त्यांना मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.चाळीसगाव मतदारसंघात प्रथमच एकाचवेळी ४० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी दिल्याने एकप्रकारे चाळीसगाववासीयांना मंत्री महाजन यांनी विकासरुपी भेटच दिली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे
आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
 रस्त्यांचे काम दर्जेदार होणार असून, गावांतर्गत कॉंक्रिट रस्ते, आवश्यक त्या ठिकाणी छोटे पूल, पाइप, मोऱ्या, संरक्षकभिंती आदी कामांचा यात समावेश असणार आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे देखभाल दुरुस्ती देखील सबंधित ठेकेदाराकडे असणार आहे.तालुक्यातील ज्या १७ गावांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन आणी विकास) अंतर्गत ४० किमीचे मंजूर रस्ते झालेले आहेत, त्या गावांची नावे अशी, कंसात किलोमीटर दिलेले आहेत. तळोंदा प्र. दे. ते पिंपळवाड निकुंभ (४.३० किमी), ब्राम्हणशेवगे ते हिरापूर (५ किमी), पिंपरखेड - शिवापूर रस्ता (१ किमी), पिंपळवाड निकुंभ ते माळशेवगे रस्ता (४ किमी), पिलखोड ते तामसवाडी रस्ता (१.५ किमी), वाकडी ते मुंदखेडा बुद्रुक व खुर्द रस्ता (३.५ किमी), खेर्डे फाटा ते खेर्डे- सोनगाव रस्ता (१.२० किमी), रामा २११ ते बोढरे रस्ता (२ किमी), हिंगोणे खुर्द ते तांदुळवाडी रस्ता (२ किमी), न्हावे वडाळा रस्ता ते ढोमणे गाव (१.५ किमी), लोंढे ते विसापूर रस्ता (१ किमी), रोकडे फाटा ते रोकडे तांडा रस्ता (१ किमी), खडकी बुद्रुक ते तांबोळे खुर्द रस्ता (३ किमी), रामा २११ ते जुनोणे रस्ता (३ किमी), रामा २११ ते वडगाव लांबे रस्ता (३ किमी), हातले ते हातले तांडा रस्ता (१ किमी), रामा २११ ते नवे दसेगाव रस्ता (२ किमी). तालुक्यातील ४० किलोमीटरचे रस्ते मंजूर केल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default