मोठी बातमी! 400 कोटींच्या घोटाळ्याची चर्चा; महसूल विभागाचे अधिकारी खडसेंच्या मुक्ताईनगरात दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंदाकिनी खडसे यांच्यावर (एकनाथ खडसे यांच्या पत्नी) 400 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.
आता या भ्रष्टाचारच्या चौकशीसाठी महसूल विभागाचे अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांना धक्क मानला जात आहे. एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणार्‍या 33 हेक्टर 41 आर जमीनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीमध्ये मांडला होता.
आणि चौकशी करण्याची मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत या प्रकरणी महसूल विभागाकडून तपास केला जाईल असं आश्वासन त्यावेळी दिले होते. दरम्यान आज महसूल विभागाचे अधिकारी मुक्ताईनगरात दाखल झाले आहेत.महसूल विभागाचे अधिकारी खडसे यांच्या जमिनीवर उत्खनन झालेलं क्षेत्र मोजण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default