याबाबत शेख फारूक शेख नजीर (वय 50 रा. राजीव गांधी नगर, नंदुरबार) या व्यापार्याने दोंडाईचा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.26 मे ते दि.19 ऑक्टोबर 2022 दरम्यान दोंडाईचा शहरातील सर्व्हे नं 56/1, 16 हजार चौ.मी. या जमिनीचे मुळ मालक हेमंत भास्कर देशमुख (रा. दोंडाईचा), राजेंद्र विष्णु इंगळे (रा.धुळे), अंबादास कन्हैयालाल मराठे (रा. दोंडाईचा), बापूसाहेब रविंद्र देशमुख (रा.दोंडाईचा) यांनी मिळकत सर्व्हे नंबर 56/9 ही फिर्यादी शेख यांना विक्री केली. त्यांचे नावे खरेदी खत करून देण्याबाबत फिर्यादी शेख यांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून 16 लाख रुपये रोख स्वरुपात व 1 कोटी 4 लाख रुपये बँक खात्याव्दारे असे एकूण 1 कोटी कोटी 20 लाख रुपये स्विकारले.
तर उर्वरीत रक्कम 1 कोटी 12 रुपये स्विकारून मिळकतीचा खरेदी विक्रीचा व्यवहार फिर्यादी शेख यांचे करणे व्यवहारीक असतांनाही व सदर मिळकतीचा खरेदी विक्रीचा व्यवहार फिर्यादी शेख यांचा झालेला असल्याचे माहित असतांनाही त्यांनी सदरची मिळकत ही राजेंद्र इंगळे हा संपूर्ण खरेदी खतातील संमतीदार असे दर्शवून खोटया व बनावट खरेदी सौंदा पावत्या तयार करून दोंडाईचा शहरातील चंपालाल पारख व गणेशमल भुरमल बंब यांच्याशी संगनमताने कट कारस्थान रचले.
त्यांच्याकडून पैसे स्विकारून त्यांच्याशी करार करून तसे दि. 19 ऑक्टोबर 2022 रोजी रजिस्टर खरेदी खत करुन देवून व घेवून फिर्यादी शेख यांचा विश्वासघात केला. तसेच त्यांची अर्थिक फसवणूक केली. याबाबत शेख यांनी दि. 10 जानेवारी 2023 रोजी दोंडाईचा पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर चौकशीअंती व पोलिस अधिक्षकांच्या परवानगीने वरील सहा जणांवर काल दोंडाईचा पोलिसात भादंवि कलम 420, 406, 437, 468, 469, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहेत
