मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करु न देण्याच्या मोबदल्यात 8 हजार रुपये लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दारासिंग जोरदार पावरा (वय-35) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. नंदुरबार एसीबीने ही कारवाई बुधवारी (दि.18) केली.
पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, दारासिंग पावरा यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी करुन 8 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पावरा यांना रंगेहात पकडण्यात आले. दारासिंग पावरा यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
