ज्ञानोबा हणमंतराव करमले हा सध्या उदगीर तालुक्यातील बोरगाव (बु), कोदळी येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. १० ऑक्टोबर २०१२ ते ३१ ऑगस्ट २०२० या काळात बेहिशेबी मालमत्ता जमविल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करमले बाबतची तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीची पडताळणी करून सत्यता बघून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी ज्ञानोबा करमले यांच्यावर सापळा लावून ३० ऑगस्ट २०२० रोजी छापा मारला. यावेळी मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने नोकरीच्या काळात बेकायदेशीररीत्या प्राप्त असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळून आलेल्या अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत.
