राज्य सरकार समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास योजना तयार करत असतात. त्यात अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना असून धुळे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधील सिध्दार्थनगर, नवजीवननगर, देशमुखनगर, भिमनगर, शनीनगर या भागात शंभर टक्के दलित समाजाचे रहिवाशी आहेत. तरी देखील शासनाच्या अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ दिला गेला नसल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
दलित वस्ती योजनेत भ्रष्टाचार; संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा
शनिवार, जानेवारी २१, २०२३
0
धुळे शहरातील शंभर टक्के दलित समाजाचा रहिवास असलेल्या परिसरात दलित वस्ती सुधार योजनेचा निधी गेला कुठे? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत. यामुळे आज प्रभागातील नागरीकांनी मनपावर धडक मोर्चा काढला. यावेळी संताप्त नागरिकांतर्फे धुळे महापालिकेच्या प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Tags
