उपसरपंच निवडीसाठी पहिल्या फेरीत, तसेच समसमान मते मिळाल्यास निर्णायक वेळी अशी ग्रामपंचायत सरपंचांना दोनदा मतदान करण्याची संमती देणारे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने ३० सप्टेंबर रोजी काढले हाेते. त्यास न्यायालयात आव्हान देण्यात आले हाेते.
उच्च न्यायालयाने दिला असुन या निकालाची अंमलबजावणी सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडीवेळी करण्यात यावी. त्यामुळे जनतेतुन निवडून आलेल्या सरपंच दोन वेळा मतदान करुन निवडणूक पुर्ण करतील असं मत निकालात उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. या निर्णयामुळे गावकी भावकीच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचाची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
