घराच्‍या तिसऱ्या मजल्यावर आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर  शहरातील लाईट बाजार परिसरात दुपारी साडेबारा वाजता सुमारास घराच्‍या तिसऱ्या मजल्यावर अचानक लागली. आगीने तात्काळ रुद्ररूप धारण केले. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र संसारोपयोगी साहित्‍य जळून खाक झाले आहे. नवापूर तील लाईट बाजार  परिसरातील राजूभाई नागरमल अग्रवाल यांच्या निवासस्थानी आग लागली. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या व्यापारी व नागरिक मदतीला धावून आले. व्यापाऱ्यांनी तात्काळ नवापूर पोलीस व नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला  पाचारण केले. अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले असून आग विझवण्याचे काम करण्यात आले. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून किरकोळ नुकसान झाले आहे
घराला लागलेल्‍या आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही. अर्धा पाऊण तासानंतर आग नियंत्रणात आली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. भर बाजारात आग लागल्याने मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी काही काळ वाहतुकीचे कोंडी निर्माण झाली. आगीत किती नुकसान झाले अजून तरी स्पष्ट झाले नाही. परंतु तिसऱ्या मजल्यावरील घर सामान जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महसूल विभागाने आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अग्रवाल कुटुंबांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default