पादचारीला ट्रॅक्‍टरची धडक; अंगावरून चाक गेल्‍याने मृत्‍यू

फुले शाहू आंबेडकर
0
वरणगाव  : तपत कठोरे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील राज्य मार्गाने पायी चालणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला भरधाव ट्रक्टरने चिरडल्याची घटना घडली. याबाबत मयताचा चुलत भावाच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत नोंद करण्यात आली 
वरणगाव पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपत कठोरा गावातील वरणगाव हतनूर राज्य मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ निंभोरा येथील २६ वर्षीय इकबाल शहा अब्दुल शहा फकिर हा पायी जात होता. या दरम्‍यान त्याला ट्रॅक्‍टरने चिरडले. चालक बाळकृष्ण गिरधर चौधरी याने रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने ट्रॅक्‍टर चालवत होता.

अंगावरून गेले ट्रॅक्‍टरचे चाक

ट्रॅक्‍टरची धडक बसल्‍यानंतर इकबाल खाली पडला; त्याच्या पोटावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. याचवेळी त्याचा चुलत भाऊ लतीफ शहा मुसा शाह फकीर तेथुन मोटारसायकलने जात असताना त्याने सदर घटना बघितली. यानंतर ट्रॅक्टर चालकाच्या मदतीने इकबाल यास गाडीमध्ये टाकून वरणगांव ग्रामीण रुग्णालयात नेले. येथील वैद्यकिय अधिकारींनी तपासणी करत मृत घोषीत केले. यानंतर मयत इकबालचा चुलत भाऊ लतीफ शहा याच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default