चाळीसगावातील ११ गुंडाना मोक्का

फुले शाहू आंबेडकर
0
चाळीसगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी जळगाव (jalgaon) स्थानिक गुन्हे शाखा दि,२८ रोजी शहरातील ११ आरोपीतांवर अखेर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपूर्वीच शहरात खून झाल्यामुळे शहरातील वातावरण तग झाले होते. तर अनेक दिवसांपासून मारामार्‍या व इतर टोळी गुन्हेगारीमध्ये वाढल्यामुळेच पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पोलीस प्रशासानाचे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. परंतू शहरात इतरही आरोपी मोकाट फिरत असून त्यांच्यावर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची गरज असल्याचे चर्चा आहे.
चाळीसगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ४८५ / २०२२ भादंवि क. ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १२०(ब) या गुन्हयांतील आरोपी (टोळी प्रमुख) अमोल छगन गायकवाड वय २५ रा. स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव, इ) (टोळी सदस्य) २) सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले रा. नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव, (अटकपूर्व जामीनावर) ३) कृष्णा छगन गायकवाड रा. नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव, ४) संतोष ऊर्फ संता पहेलवान रमेश निकुम रा.हिरापुर ता.चाळीसगाव जि. जळगाव, ५) विक्की ऊर्फ शुभम विजय पावले वय २३ रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ६) श्याम ऊर्फ सॅम नामदेव चव्हाण वय २४ रा. हिरापुर ता. चाळीसगाव, ७) सचिन सोमनाथ गायकवाड वय २२ रा.बाबाजी चौक चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव, ८) जयेश दत्तात्रय शिंदे (पाटील) वय २४ रा. भोरस खुर्द ता.चाळीसगाव जि. जळगाव, ९) उद्देश ऊर्फ गुड़ सुधिर शिंदे वय २४ रा. हिरापुर ता.चाळीसगाव जि. जळगाव, १०) योगेश रतन पांचाळ (पडवळकर) वय २६ रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ११) पुष्पराज ऊर्फ सुनिल जगताप रा. पिंपळरखेड ता.चाळीसगाव जि.जळगाव (फरार) गुन्हा दाखल झालेला आहे.
सदर गुन्हयांतील आरोपीतांनी यापुर्वी टोळीने आर्थिक फायदयासाठी बरे गुन्हे केलेले असल्याचे चाळीसगाव शहर पो.स्टे. अभिलेखावर दिसुन आले. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जळगाव, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अ सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सदर टोळीवर वरील दाखल गुन्हयांत मोक्का कायदयाचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे श्री. अभयसिंह देशमुख, सहा.पोलीस अधीक्षक यांनी मोक्का प्रस्ताव तयार करुन स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्फत मा. पोलीस अधीक्षक सो. जळगाव कार्यालयात दि.२१/०१/२०२३ रोजी सादर केला. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव यांचेकडे प्रस्ताव प्राप्त झालेनंतर पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन दि. २१/०१/२०२३ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे कडेस प्रस्तावर सादर केला. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन वरील आरोपीतांनी टोळीने केलेल्या गुन्हे अभिलेख तपासणी करुन सदर गुन्हयांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे क. ३(१) (खख), ३(२), ३(४) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी दि.२५/०१/२०२३ रोजी दिल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. वरील गुन्हयांतील वरील आरोपीतांवर मोक्का कायदयाखाली कलम लावण्यात आलेले आहे. सदर प्रस्ताव पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफा युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ / सुनिल पंडीत दामोदरे तसेच चाळीसगाव शहर पो.स्टे कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक, सहा. पो. निरी. विशाल टकले, यांनी योगदान दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default