हत्येचा पुरावा नसताना पोलिसांनी लावला छडा; गुन्हेगारांना पकडल्यावर गावकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली

फुले शाहू आंबेडकर
0
वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पंत) येथील सत्याग्रही घाटात एक हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली होती. अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. चारित्र्यावर संशय घेत महिलेला सत्याग्रही घाटात दगडाने ठेचून जिवंत जाळले. जेव्हा पोलिसांनी या ‘ब्लाईंड मर्डर मिस्ट्री’चा उलगडा केला आहे. 

वर्धा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेसह तळेगाव पोलिसांनी तब्बल ४० दिवस दिवसरात्रं एक करुन तपास केला. तपासदरम्यान पोलिसांना ज्योत्सनाचा पती मनिष भोसले आणि त्याचा मावस भाऊ प्रवीण पवार यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या.

त्यांचा नेर जि. यवतमाळ येथील विविध पारधी बेड्यांवर शोध घेतला. अखेर तांत्रीक पद्धतीने शोध घेतला असता ते दोघेही सातेफळ येथील जंगलात असल्याचे समजले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींचा कसून शोध घेत अख्खा जंगल परिसर पिंजून काढला आणि पाठलाग करुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली असता ज्योत्सनाच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिला अमरावती येथून दुचाकीवर बसवून सत्याग्रही घाटात आणले तेथे दोघांत वाद झाला असता ज्योत्सनाला दगडाने ठेचून पेट्राेल टाकून जाळल्याचे मनिषने सांगितले.

आरोपी मनिष भोसले हा मुख्य आरोपी असून याच्यावर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत, दारुबंदी आदी विविध गंभीर असे दहा गुन्हे यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा करुन आरोपींना गजाआड केल्यानंतर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी संपूर्ण टिमला ५० हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default