महामार्गावर गॅस टँकर पलटी; परिसरात उडाली खळबळ

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गरताड गावाजवळ गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली. टँकर पलटी झाल्‍यानंतर गॅस गळती होवू लागल्‍याने परिसरात खबराट निर्माण झाली होती.
बडोद्याहून हैदराबादकडे जाणारा गॅस टँकर चालवत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टँकर महामार्गावर पलटी झाला. या अपघाता
मध्ये सुदैवाने जीवित हानी टळली आहे. त्याचबरोबर गॅस गळतीमुळे होणारा मोठा धोका देखील टळला असल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे

अग्निशमन दल तातडीने दाखल

गॅस टँकर पलटी झाल्‍यानंतर टँकरमधून गॅस गळती देखील सुरू झाली होती. परंतु अग्निशमन विभागाच्या पथकास या संदर्भातील माहिती मिळताच   अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत ही गॅस गळती अथक प्रयत्नानंतर थांबविण्यात आली आहे. यामुळे पुढची मोठी दुर्घटना टळली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default