जवळगावातीलतील ईश्वर कॉलनीत वास्तव्यास असलेली साक्षी दिनेश प्रजापत (वय १६) असे मृत तरूणीचे नाव आहे. साक्षी प्रजापत ही परिवारासह वास्तव्याला होती. वडील धान्य मार्केट दुकानात दलालीचे काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवारी (१२ जानेवारी) सकाळी वडील कामाला निघून गेले. साक्षी ही आईसोबत घरी होती.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दुपारी आई गायीला पाणी पाजण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. तेवढ्यात साक्षीने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण नेमके कळू शकले नाही. साक्षीची आई घरात आल्यानंतर मुलीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलीला पाहताच एकच हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
