मांडळ (ता.शिरपुर शिवारातील साईबाबा अपार्टमेंटसमोर विश्वजीतचे घर आहे. त्याचे वडील विनोद राठोड कन्नड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. शहरातील एका महाविद्यालयात विश्वजीत अकरावीच्या वर्गात शिकत होता. २६ जानेवारीला दुपारी दोन जण त्याच्या घरी गेले. त्यांनी पैशांवरुन विश्वजीतशी वाद घातला. त्यानंतर संतापाच्या घरात तो मोटारसायकल घेऊन घरातून निघून गेला.
पुलाजवळ दिसली मोटारसायकल
विश्वजित उशिरापर्यंत परत न आल्याने त्याच्या आईने विनोद राठोड यांना फोन करुन माहिती दिली. विनोद राठोड यांनी त्यांच्या मित्रांना शोध घेण्यास सांगितले. शोध घेत असतांना सायंकाळी साडेसहाला तापी नदीवरील पुलावर त्याची मोटारसायकल उभी दिसली. त्यामुळे नदीपात्रात त्याचा शोध सुरु झाला. आज (२७ जानेवारी) त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
कर्जाचा घेतला होता हवाला
विश्वजीतच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध सावकारांकडून एकाने घेतलेल्या कर्जाचा विश्वजीतने हवाला घेतला होता. मात्र त्याचा मित्र वेळेत कर्जफेड न करु शकल्यामुळे सावकारांनी विश्वजीत मागे तगादा लावला होता. कर्जापोटी लाखो रुपयांची मागणी त्याच्याकडे करण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून विश्वजीतने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
