शेतीचे उत्पन्न बाजूला सारत शेतकरी गावाची समस्या असल्याने स्वतःचा रब्बी हंगाम सोडून स्वतःचे नुकसान सहन करतो. शासनाच्या देयकावर विश्वास ठेवून त्याला दोन वर्षांपर्यंत विहीर अधिग्रहणाचा मोबदला अनुदान मिळत नाही. मोबदला न मिळाल्याने व रब्बी हंगामाचे नुकसान होते. असे असताना या वर्षी मोबदला न मिळाल्याने शेतकरी पाणी देण्यास तयार नसून उन्हाळ्यात गावातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल मोठ्या प्रमाणावर होतील म्हणून संबंधित विभागाने लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून पाणीटंचाईची समस्या सोडवावी, अशी मागणी सरपंच महा सेवासंघ जिल्हाध्यक्ष तथा सोनशेलू सरपंच प्रियंका बडगुजर यांनी केले आहे. या प्रकरणी कोणावर काय कारवाई होते, मोबदला कसा व केव्हा दिला जातो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.मोबदला न मिळालेली गावेमागील २०२१-२२ वर्षीचे शिंदखेडा तालुक्यात सोनशेलू, विखरण, सवाईमुकटी चुडाणे, सुराये, रुदाने, कर्ले, जोगशेलू, मांडळ, अंजनविहिरे, चौगाव खुर्द, खलाणे, चौगाव बुद्रुक, दरखेडा, खर्दे बुद्रुक, जातोडा, मेथी, वाडी, वरझडी, देवी, सुलवाडे अशा २३ गावांतील पाणीटंचाईचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मागील वर्षापासून मिळालेला नाही
ग्रामपंचायतीतर्फे प्रस्ताव पाठविला जातो. त्यानुसार देय बिल देण्यात येते. मात्र प्रस्ताव आला नाही तर मोबदला अनुदानाचे देय बिल देऊ शकत नाही." -डी. एम. पाटील,गटविकास अधिकारी, शिंदखेडा"तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षाचा अधिग्रहण मोबदला मिळाला नाही, तसेच तालुक्यातील पाच गावांना दोन वर्षांचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी असून, तत्काळ मोबदला मिळावा."-प्रियंका बडगुजर,जिल्हाध्यक्षा, सरपंच महसेवा संघ व सरपंच, सोनशेलू"आम्ही फक्त अधिग्रहणाचा आदेश करतो. अनुदान पंचायत समितीकडून मिळत असते त्यांनी याबाबत पत्रव्यवहार करून अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करावा."-आशा गांगुर्डे, तहसीलदार, शिंदखेडा
