आरावे येथील शेतकरी भिका विठ्ठल धनगर, विनोद तुळशीराम पाटील यांच्या मालकीचे चार बैल ३ फेब्रुवारीला चोरीस गेले होते. शेतकऱ्यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिसांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेले चार बैल, पिकअप (एमएच ४८ टी १६१५) असा एकूण चार लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिकअप शिरपूर तालुका हद्दीत मिळून आली. त्यावरील चालक बबलू सलदर्या कन्नोजे (वय २७, रा. धानोरा, जि. बडवानी मध्य प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले
चोरीस गेलेले बैल शेतकऱ्यांना परत; शिंदखेडा पोलिसांची कारवाई
रविवार, फेब्रुवारी १२, २०२३
0
चिमठाणे (जि. धुळे) : शिंदखेडा तालुक्यात जनावरे चोरणारी टोळी काही दिवसांपासून सक्रिय झाली आहे. गुरुवारी (ता.९) शिंदखेडा पोलिसांनी मध्य प्रदेशातील पिकअप चालकाला अटक करून आरावे (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्यांचे चार बैल शुक्रवारी (ता.१०) परत केले.
Tags
