पुलावरुन तापी नदीमध्ये उडी घेत तरुणाची आत्महत्या

फुले शाहू आंबेडकर
0
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तरूणाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत गणेश संजय सोळुंखे (वय-23) आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे गणेश सोळुंखे हा आईवडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. ट्रॅक्टरवर चालकाचे काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. सोमवारी दुपारी 5 वाजेच्या सुमारास घरात कुणाला काहीही न सांगता थेट गावानजीक असलेल्या तापी नदीच्या पुलावर गेला. तिथे त्याने थेट पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. त्याने तापी नदीत उडी घेतल्याचे काटावर गुरे चारणार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गावाकर्‍यांना ही घटना सांगितली. त्यानुसार गावातील ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने मृतदेह तापीनदीतून बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी मयत घोषीत केले.

मयताच्या पश्चात आई विठाबाई, वडील संजय पांडूरंग सोळुंखे आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ श्यामकांत बोरसे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default