बलात्कारप्रकरणी धुळ्यातील युवा नेत्याला भिवंडी पोलिसांच्या बेड्या

फुले शाहू आंबेडकर
0

लग्नाचे आमिष दाखवून सोबत नेत इगतपुरीच्या तरुणीवर पिस्तूलचा धाक दाखवून बलात्कारप्रकरणी धुळ्यातील एका युवा नेत्यावर कोनगाव (भिवंडी) पोलिसात  गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात त्या युवा नेत्याला काल दुपारी भिवंती पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली.

नाशिक जिल्ह्यातील घोटी (इगतपुरी) येथील 31 वर्षीय पीडितेने कोनगांव (भिवंडी) पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिला लग्नाचे आमिष दाखवून भिवंडी येथील हॉटेल ग्रीन कॉन्टी येथे नेण्यात आले. तिथे तिच्या डोक्याला पिस्तुल लावत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला. तसेच शारिरीक संबंधाचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

अत्याचाराचा हा प्रकार 1 नोव्हेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान घडला. दि.1 फेब्रुवारी रोजी पीडित तरुणीने कोनगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी धुळ्यातील युवा नेत्याविरुध्द भादंवि कलम 376 (2) एन प्रमाणे गुन्हा दाखल केला. तर काल भिवंडी पोलीस धुळ्यात दाखल झाले होते.

त्यांनी त्या युवा नेत्याला त्यांच्या देवपूरातील जिल्हा क्रिडा संकुल परिसरातील घरातून ताब्यात घेतले. हा युवा नेता एका संघटनेचा अध्यक्ष असल्याचे समजते. ही कारवाई एसीपी किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक डी.पी. नागरे, महिला पोलीस उपनिरीक्षक ए. डी. घाटगे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default