गुडघेदुखीमुळे महिलेची गळा चिरून आत्महत्या; ह्रदयद्रावक घटना!

फुले शाहू आंबेडकर
0
गुडघेदुखीला कंटाळून महिलेने गळा चिरून जीवनयात्रा संपविल्याची ह्रदयद्रावक घटना दोंडाईचा ता. शिंदखेडा येथे पाच फेब्रुवारीला घडली.
लीलाबाई चंद्रसिंग मोरे (वय ४८, रा. एकलव्य टेक भिलाटी, दोंडाईचा) असे तिचे नाव आहे. लीलाबाई मोरे (भिल) पाच फेब्रुवारीला दुपारी अडीचच्या सुमारास घरी एकट्या होत्या. यादरम्यान त्यांनी गुडघेदुखीच्या आजाराला कंटाळून स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले.
ही बाब लक्षाच येताच त्यांना कुटुंबियांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोमवारी (ता. २०) दोंडाईचा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default