शिरपूरात घराच्या आवारातच तरूणीवर बलात्कार, एकावर गुन्हा

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर शहरातील बालाजी नगरात घराच्या आवारातच तरूणीवर  एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तीन दिवसांनंतर संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पिडीतेने काल शिरपूर शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, दि.13 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास करवंद नाका परिसरातील बालाजी नगरातील पिडीतेच्या चुलत आजोबांच्या घरी ही घटना घडली. घराच्या जिन्याजवळील मोकळ्या जागेत कमलेश सुनिलसिंग जव्हेरी (रा.वाल्मीक नगर, शिरपूर) याने पिडीतेला लव्हशिप करण्याचा आग्रह धरला.
तिने त्यास नकार देताच त्याने पिडीतेवर जबरीने अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यानुसार कमलेश जव्हेरी याच्याविरोधात भादंवि कलम 376(2) (फ), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुरकुटे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default