याबाबत अधिक माहिती अशी की, स्वाती जनार्दन गामणे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. गामणे व त्यांचे कुटुंबीय हे सामनगाव रोड सिन्नर फाटा नाशिकरोड येथे राहत असताना याठिकाणी राहत असलेले नंदकिशोर काशिनाथ गरकळ, सुमन नंदकिशोर गरकळ व ऋषिकेश नंदकिशोर गरकळ यांनी स्वाती गामणे यांचा भाऊ विकास गामणे यास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून स्वाती व त्यांच्या आईकडून वेळोवेळी चेक व ऑनलाइनद्वारे ट्रान्सफर करून सुमारे २० लाख ३६ हजार रुपये घेतले.
मात्र, त्यानंतर पैसे घेऊन सुद्धा नोकरी दिली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजताच स्वाती गामणे यांनी तात्काळ नाशिकरोड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.
