कुसूंब्यात पोलीस कर्मचार्‍यांवर हल्ला

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील कुसूंबा येथे पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला  करण्याता आला. त्यात तीन पोलिस जखमी झाले असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत पोना अविनाश गहिवड (वय 42) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. 18 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्यासह पोकाँ संदीप पाटील, पोकाँ अमित जाधव हे गावात पोलिस बंदोबस्तावर होते. तेव्हा गावातील नितीन नारायण भिल व सुरेश उर्फ भुरा ढिवरे यांनी तिघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत शांततेचा भंग केले. म्हणून तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गुट्टे करीत आहेत. पोलिसांनी नितीन भिल यास अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default