(जि. धुळे) : येथील पावणेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेला माघ शुद्ध पौर्णिमा, रविवार (ता. ५)पासून सुरवात होणार आहे. श्री खंडेराव बाबा विकास संस्था, शिरपूर पालिका व प्रशासनातर्फे यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. रविवारी सकाळी नऊला आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते श्री खंडेराव महाराजांची महाआरती करून यात्रेला सुरवात केली जाणार आहे. या वेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, कोशाध्यक्ष किरण दलाल, सचिव गोपाल मारवाडी, विश्वस्त गुलाब भोई, गोपाल ठाकरे, शरद अग्रवाल, श्रीहरी यादगिरीवार, व्यवस्थापक महेश देवकर आदींनी संयोजन केले आहे.२०१९ नंतर कोरोना संक्रमणामुळे यात्रोत्सव स्थगित करण्यात आला होता. गेल्या वर्षी संस्थानने प्रयत्न करूनही प्रशासनाकडून यात्रेची परवानगी मिळू शकली नव्हती. त्यामुळे यंदाची यात्रा अधिक भव्य स्वरूपात भरविण्यासाठी संस्थानचे प्रयत्न सुरू आहेत
3/related/default
