शिरपूर येथे धमक्यांना घाबरून युवकाचा टोकाचा निर्णय

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर (धुळे) : पत्नीच्या आत्महत्येनंतर सासरच्या लोकांकडून धमक्या मिळत होत्‍या. याला घाबरून युवकाने आत्महत्या केल्याची घटना २ फेब्रुवारीला  सायंकाळी झेंडेअंजन (ता. शिरपूर) येथील शेतात घडली. सियाराम दारासिंह पावरा असे मृत युवकाचे नाव आहे. भाऊ कृष्णा पावरा याने ७ फेब्रुवारीला सांगवी पोलिस 
ठाण्यात फिर्याद दिली.

सियारामचा विवाह नवाधाबापाडा (ता. शिरपूर) येथील माहेर असलेल्या आशाबाई पावरा हिच्याशी झाला होता. १८ डिसेंबरला तिचा मृतदेह झेंडेअंजन शिवारातील विहिरीत आढळला होता. पती व सासरच्या लोकांनी केलेल्या छळामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला होता.

घाबरून आत्‍महत्‍या केल्‍याबाबत भावाची फिर्याद

यानंतर सियारामला सोडणार नाही, खुनाचा बदला खून करून घेऊ, त्याला मारून टाकू अशा धमक्या संबंधितांकडून देण्यात येत होत्या. त्यांना घाबरून सियारामने आत्महत्या केल्याचे कृष्णा पावरा याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. संशयित गुरज्या चेना पावरा, सुनील गुरज्या पावरा, मंगेश गुरज्या पावरा (सर्व रा. नवाधाबापाडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default