वृत्तानुसार, आपल्या प्रेयसीला मेसेज केल्याचं कळतात तरुणाचा संताप झाला. यानंतर त्याने मित्राची हत्या केली आणि अत्यंत क्रूरपणे त्याचं मुंडकं कापलं. तो इतक्यावरच थांबला नाही. यानंतर त्याने त्याचं ह्रदय बाहेर काढलं आणि गुप्तांग तसंच बोटं छाटून टाकली. यानंतर त्याने पोलीस स्थानक गाठलं आणि आत्मसमर्पण केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि आरोपीची प्रेयसी यांच्यात आधी प्रेमसंबंध होते.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्या करण्यामागे अन्य काही कारण आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.
नवीन असं पीडित तरुणाचं नाव असून हरिहर कृष्णा अशी आरोपीची ओळख पटली आहे. नवीन, हरिहर कृष्णा आणि तरुणी एकाच कॉलेजात शिकत होते. दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडले होते. सर्वात प्रथम नवीनने मुलीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण काही वर्षांनी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. यानंतर हरिहरने तरुणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि दोघेही एकत्र आले.
ब्रेकअप झालेला असतानाही नवीन हा सतत तरुणीच्या संपर्कात होता. तो सतत तरुणीला मेसेज आणि फोन करत होता. यामुळे आरोपी हरिहर संतापला होता. यावरुन दोघांमध्ये 17 फेब्रुवारी रोजी जोरदार भांडण झालं. या भांडणादरम्यान हरहिरने नवीनची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे फोटो काढून आपल्या प्रेयसीला पाठवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
