उपनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेट समोर संशयित सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याने महिला व तिच्या मुलीवर चाकूने सपासप वार करून स्वतःवर देखील चाकूने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेत एक ३४ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याच महिलेच्या सोळा वर्षीय मुलीवर देखील हल्ला करण्यात आला आहे. या मुलीला नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत महिला व तिच्या मुलीवर वार करून स्वतःवर देखील त्याच चाकूने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
