मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू

फुले शाहू आंबेडकर
0
विहिरीत गाळ काढण्यासाठी उतरलेल्या मजुराच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने त्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुबारक रमजान तडवी असे या मृत मजुराचे नाव असून तो हिंगोणा ता. यावल येथील रहिवासी आहे. याबाबत फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हिंगोणा  येथील मजूर मुबारक रमजान तडवी (वय ३२) हा १७ फेब्रुवारी शेतकरी हुना चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील शेतातील विहिरीमधील गाळ काढण्याच्या कामासाठी गेलेला होता. रात्री एकच्या सुमारास तो विहिरीवर काम करीत असताना मुबारक तडवीच्या अंगावर मातीचा ढिगारा पडून त्या खाली दबून गुदमरून त्याचा दुदैवी मृत्यू झाला. याबाबत शेतमालक हुना चोपडे यांनी दिलेल्या माहितीवरुन फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

घरातील एकमेव कमावता व्यक्ती गेला

यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. मृत मुबारक तडवी यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. मुबारक तडवी हा त्याच्या घरातील कमावता एकमेव व्यक्ती होता. त्याच्या मजुरीवरच त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता. शासनातर्फे त्यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default