विवाहाचे विधी सुरु असताना नवरीला हार्ट अटॅक, मंडपातच प्राण सोडले, कुटुंबाचा अनोखा निर्णय

फुले शाहू आंबेडकर
0

लग्नाचे विधी सुरु असतानाच नवरीला अस्वस्थ वाटू लागले. चक्कर आल्यामुळे ती कोसळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

विवाहाचे विधी सुरु असतानाच हृदयविकाराचा धक्का आल्याने नववधूचा लग्न मंडपातच मृत्यू झाला. गुजरातमधील भावनगर येथील सुभाषनगर भागात सुरु असलेल्या लग्न सोहळ्यात वधूने अखेरचा श्वास घेतला. या घटनेने दोन्ही कुटुंबीयांवर शोककळा पसरली. अखेर वधूच्या धाकट्या बहिणीसोबत नवरदेवाचं लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
भावनगरमधील भगवानेश्वर महादेव मंदिरासमोर उभारलेल्या लग्न मंडपातच ही दुर्दैवी घटना घडली. जिनाभाई राठोड यांची कन्या हेतल आणि नारी गावातील राणाभाई बुताभाई अलगोतर यांचा सुपुत्र विशाल यांचा विवाह सोहळा सुरु होता. लग्न मंडप पाहुण्यांनी भरलेला होता. सर्वत्र जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण होतं. पुढे काहीतरी विपरित घडेल, याची कल्पनाही कोणाला शिवली नसेल.
लग्नाचे विधी सुरु असतानाच हेतलला अस्वस्थ वाटू लागले. चक्कर आल्यामुळे ती खाली कोसळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र हेतलचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
हेतलच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच नातेवाईकांनी पर्याय सुचवला. हेतलच्या धाकट्या बहिणीने ताईची जागा घ्यावी आणि विशालसोबत बोहल्यावर चढावं, लग्नाचे विधी पूर्ण करावेत, असं नातेवाईकांनी सांगितलं. जड अंतःकरणाने वधूमाता आणि वधूपित्याने हा निर्णय घेतला. हेतलची धाकटी बहीणही तयार झाली. लग्नविधी पूर्ण होईपर्यंत हेतलचा मृतदेह शवागरात ठेवण्यात आला.
भावनगर शहराचे नगरसेवक आणि मालधारी समाजाचे नेते लक्ष्मणभाई राठोड यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुलीच्या मृत्यूची घटना धक्कादायक असली तरी नवरदेव आणि कुटुंबाला रिकाम्या हाती परतावे लागू नये, यासाठी उत्तम उदाहरण घालून देण्याची विनंती मालधारी समाजातील काही सदस्यांनी कुटुंबीयांकडे केली होती
वधूसाठी लग्नाची मिरवणूक घेऊन वर हॉस्पिटलमध्ये पोहोचला, बेडलाच बनवले मंडप!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default