घरफोडीची उकल; दोन चोरटे मुद्देमालासकट ताब्‍यात

फुले शाहू आंबेडकर
0
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस  आली होती. या घरफोडीची उकल करत दोन चोरट्यांना चाळीसगाव रोड पोलिसांनी  मुद्देमाला सकट मुसक्या आवडल्या आहेत
येथे झालेल्‍या घरफोडी दरम्यान चोरट्यांनी जवळपास ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चाळीसगाव रोड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांनी जवळपास ४४ हजार रुपये रोकड व दहा हजार रुपयांचे सोने असा मुद्देमाल लंपास केलेला होता.

३६ हजाराचा मुद्देमाल जप्‍त

चोरट्यांकडून चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे दोन्ही चोरटे धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे असून या चोरट्यांनी चोरी केल्यानंतर मालेगाव येथे पळ काढलेला होता. परंतु चाळीसगाव रोड पोलिसांनी या घरफोडीचा तपास करत असताना या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून पुढील कारवाई चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default